डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालया तर्फे अंतर महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय भव्य स्पर्धांचे आयोजन

जळगाव, दि. 6 (जनसंवाद live): एस.एन.डी.टी विद्यापीठ मुंबई, यजमान गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे 8 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान अंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला असून यामध्ये महाराष्ट्र, नोएडा, केरळ, गुजरात यांचा समावेश आहे. चारशे ते साडेचारशे विद्यार्थिनींनी या खेळांमध्ये सहभाग नोंदणी करणार आहे.
हे सामने गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, टग ऑफ वार, तायक्वांदो, अथलेटिक्स (100,200,400 Mts.Run/ High Jump/Long Jump) या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
प्रत्येक खेळासाठी कुशल पंच आणि प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खेळाडूंच्या प्राथमिक उपचारासाठी मैदानावर डॉक्टरांची टीम सुद्धा उपस्थित असणार आहेत. अत्यावश्यक सेवा अॅम्बुलन्सची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र, ट्रॉफी देण्यात येणार आहे. खेळांचा समारोप १० ऑक्टोबर 2025 रोजी होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण हे युट्युब वर व अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत वारके, निलिमा वारके, चंद्रकांत डोंगरे यांनी दिली.




