Breaking
जळगावसांस्कृतिक

कैलास भोळे यांच्या घरी वहनाचे पुजन, मंत्री गिरीष महाजन व आमदार सुरेश भोळे यांची उपस्थिती

जळगाव, दि. 26 (जनसंवाद लाईव्ह): पोस्टल कॉलनी येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते कैलास भोळे यांचाकडे गुरुवार दि. २३ रोजी हत्ती वहनाचे आगमन झाले. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व आमदार राजू मामा भोळे व कैलास भोळे यांचे चिरंजीव गिरीष भोळे यांच्या हस्ते वहनाची पुजा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात ह.भ.प. गौप्रेमी गजानन महाराज वारसाडेकर यांच्या भव्य कीर्तनाने झाली, वहन पूजनानंतर माजी नगरसेवक स्व. किरण पंडितराव भोळे यांच्या स्मरणार्थ श्री गिरीश कैलास भोळे यांच्या सौजन्याने 3 वॉटर टँकर चे लोकार्पण जलसंपदा व आप्पत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते कारण्यात आले.

यावेळी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी, भरत अमळकर, दिपक सूर्यवंशी, सुनिल बढे, माजी नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, प्रभाकर पाटील, लीलाधर तायडे, दादा राठोड, अॅड. कुणाल पवार, हितेश जावळे, बालू भोळे, मुकेश महाजन, शैलेंद्र पाटील, शेखर चौधरी, सुरज चौधरी, कुशल महाजन, विशाल पाटील, पवन शिरसाळे, विनोद शिरसाळे, किशोर शिरसाळे, दिपक पाटील, भूषण पाटील, जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button