राष्ट्रीय संस्कार केंद्राच्यावतीने रामेश्वर काॅलनीत रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय संस्कार केंद्राच्यावतीने रामेश्वर काॅलनीत रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगांव, दि.2 (जनसंवाद live): शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आज राष्ट्रीय संस्कार केंद्र जळगाव च्या वतीने रामेश्वरकॉलनी मेहरूण परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक, महिला भगिनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्सहात रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.
विशेष म्हणजे परिसरातील ४० रक्तदात्या पुरुषांसोबत मातृशक्ती सौ.अर्चना पाटील,सौ.रेखा पाटील,सौ.शहाबाई कदम यांनी सुद्धा स्वयंस्पृतीने रक्तदान केले.
शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव शहर कार्यवाह विजय ठाकरे, रामेश्वर काॅलनीचे नगरकार्यवाह प्रल्हाद पव्हणे, सहकार्यवाह किरण लाडवंजारी, सागर सानप, सचिन लाडवंजारी, किशोर ढाकणे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी माधवराव गोळवलकर रक्तपेटीचे व स्वामी समर्थ केंद्राचे सहकार्य लाभले.




