
जळगाव, दि. 27 ( जनसंवाद live): संविधान सन्मान संमेलन जळगांव यांचे विद्यमाने हिरक महोत्सवी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी पुष्पहार अर्पण केला. हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी सूत्रसंचलन व संविधानाच्या प्रा स्ताविकेचे वाचन केले. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधानाचे महत्त्व परिणामकारकपणे विषद केले. संविधान हाच आपला राष्ट्रवाद असेही ते म्हणाले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या पासून संविधान जागर रॅलीस प्रारंभ झाला. रॅली जळगांव शहराच्या मध्यवर्ती भागातून निघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे संपन्न झाली. संविधान जागर रॅली मध्ये मोठ्या संख्येने स्री पुरुष सहभागी झाले होते. संविधानाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान हाच आपला राष्ट्रवाद इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्वागताध्यक्ष डॉ करीम सालार, मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, जयसिंग वाघ, प्रा प्रीतीलाल पवार, चेतन नन्नवरे, प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, संजय सपकाळे, ॲड आनंद कोचूरे, जगदीश सपकाळे, दिलीप सपकाळे, प्रा. किसन हीरोळे, डॉ सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील, डॉ मिलिंद बागुल ,भारती रंधे, संध्या तायडे, भगवान बाविस्कर, अजय बिऱ्हाडे, दादाराव शिरसाठ, महेंद्र केदारे, राजू मोरे, ॲड आकाश सपकाळे,राजू मोरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




