दक्षा फाउंडेशन आयोजीत स्वयंरोजगार मेळाव्यात नव्वद महिला व तरूणांनी घेतला लाभ

जळगाव, दि.23 (जनसंवाद live): दक्षा फाउंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्यामार्फत रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी महिलांसाठी व तरुणांसाठी महा रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला जळगाव शहराचे लाडके आमदार राजुमामा भोळे, जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योगाचे श्री विसपुते, वाडेकर, दिनेश पाटील, कन्सल्टंट श्री समाधान पाटील तसेच दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ मीनाक्षी सपकाळे, आशिष सपकाळे आदी उपस्थित होते.
स्वयंरोजगार मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना आमदार राजुमामा भोळे म्हणाले की पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरू नका, ते तुम्हाला फक्त मागे फिरवतील तुमचे काम करणार नाही. स्वतःच्या पायावर उभे रहा छोटामोठा रोजगार निर्माण करा, आई वडीलांना आदर्श माना आणि जीवनात पुढे जा.
या स्वयंरोजगार मेळाव्यात नव्वद महिला आणि तरुणांनी सहभाग नोंदवला. प्रोफेसर श्री विशाल पवार, सचिन सरकटे यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच तृषाल सोनवणे, राजू डोंगरे, सतीश महाजन, हरिओम सूर्यवंशी, संजू वर्यानी, निलेश परदेशी, मनोज जयराज, शिवा पुरोहित, महामाया बुद्ध विहाराच्या सौ. पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन अडकमोल, राधे शिरसाठ, कमलेश डांबरे, इस्माईल खाटीक, अशपाक खाटीक, पटेल नूर, मोहम्मद अशपाक शेख, मुकुंदराव वाणी, संतोष वाणी, बंटी वाणी, आदी उपस्थित होते.



