ब्रम्होत्सवाची तयारी पुर्ण, आज संध्याकाळी देवी गुंजनजी वशिष्ठ यांचे संगीतमय सुंदरकांड

जळगाव, दि. 24 (जनसंवाद live): पाळधी येथील साई मंदिरात आज पासुन तीन दिवस ब्रम्होत्सव सुरू होत आहे. श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट पाळधी तर्फे दर वर्षी ब्रम्होत्सवाचे आयोजन करण्यात येते. हे वर्ष ब्रम्होत्सवाचे 23 वे वर्ष असून तयारी पूर्णत्वास आली आहे.

स्टेज मंडपची तयारी झाली असून यावर्षी साई मंदिर नव्याने बांधुन मंदिरात नक्षीकाम असलेले खांब, मंदिर परीसरात पथदिवे तसेच रंगरंगोटी करून मंदिर परीसरात भला मोठा कारंजा बांधल्याने मंदिराला अजुनच शोभा आली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या ब्रम्होत्सवात 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता देवी गुंजनजी वशिष्ठ यांचे संगीतमय सुंदरकांड होणार आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता इंडियन ऑयडाॅल गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा भजन संध्या कार्यक्रम संपन्न होणार आहे तर 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची पुर्ण तयारी झाली असून सुनिल झवर यांनी भाविकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरज सुनिल झवर, शरदचंद्र कासट, नितीन लढ्ढा, मनिष झवर, राजेश दोषी, राजेश तोतला, दीपक ठक्कर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र चौधरी, नरेश दोषी, सतीश अग्रवाल, कैलास मालू आदी परीश्रम घेत आहे.




