संगीतमय सुंदरकांडने ब्रम्होत्सवाला सुरूवात, राम व हनुमानाच्या झाकीने भाविक प्रभावित. आज इंडियन ऑयडाॅल गायक रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांचा भजन संध्या कार्यक्रम

जळगाव, दि. 25 (जनसंवाद live): पाळधी येथील साई मंदिराच्या तेवीसव्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी देवी गुंजनजी वशिष्ठ यांच्या संगीतमय सुंदरकांड ने सुरूवात झाली. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेची साई मंदिराचे ट्रस्टी सुनिल झवर व त्यांचे चिरंजीव सुरज झवर यांनी सपत्निक आरती करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. जळगाव व पाळधी गावातील भक्तांनी संगीतमय सुंदरकांड ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तेवीसव्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरावर केलेल्या रोषणाई मुळे मंदिर अधिकच खुलून दिसत होते. साई बाबांच्या मंदिरातील गाभारा फुलांनी सजवला होता. बाबांची मुर्ती खुपच सुंदर दिसत होती. मंत्री गिरीष महाजन यांच्या पत्नी व जामनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा साधना महाजन यांनी मंदिराला भेट दिली व बाबांचे दर्शन घेतले. पाळधी परीसरातील भाविकांनी सााई मंदिरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

आज संध्याकाळी सहा वाजता इंडियन ऑयडाॅल गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा भजन संध्या कार्यक्रम संपन्न होणार आहे. उद्या शुक्रवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा महाभिषेक होईल तर दुपारी चार वाजता महाप्रसादाने ब्रम्होत्सवाचा समारोप होईल.




