प्रभाग एकचे अपक्ष उमेदवार घनशाम फेगडे यांचा प्रभागात जोरदार प्रचार

जळगाव, दि. १३ ( जनसंवाद live): जळगाव शहर महानगरपालिका निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचार करत आहेत. प्रभाग क्रमांक १ ब मधून घनश्याम भागवत फेगडे हे अपक्ष उमेदवार असुन त्यांची निशाणी शिट्टी आहे. घरोघरी भेट देऊन ते आपला प्रचार करत आहे. त्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
घनशाम भागवत फेगडे हे प्रभाग एक चे स्थानिक उमेदवार आहे. व प्रतिस्पर्धी उमेदवारांना फाईट देत आहे. घरोघरी जाऊन त्या प्रभागातील समस्या व स्थानिक लोकांच्या काही मागण्या समस्या यांची माहिती घेऊन येणाऱ्या काळात त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. युवा रोजगार ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेसाठी उत्तम उपाय योजना, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, महिला व पुरुष नागरिकांसाठी प्रभागात सुलभ शौचालय चांगले दर्जाचे उपलब्ध करून देणे, आरोग्याच्या दृष्टीने प्रभागातील साफसफाई उत्तम दर्जाची व्हावी व रोगमुक्त परिसर व्हावा यासाठी प्रयत्न करणार. तसेच गटारी पथदिवे व मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.



