Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चिमुकल्यांनी उभारले शिवरायांचे भव्य किल्ले

जळगाव, दि.१७ (जनसंवाद live): छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक किल्ले साकारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला. कार्डबोर्ड व इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आकर्षक व भव्य किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या.
लहान वयातही विद्यार्थ्यांनी बुरूज, तटबंदी, दरवाजे तसेच भगवे ध्वज यांची कल्पक मांडणी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक किल्ल्यातून शिवकालीन वैभवाची झलक पाहायला मिळाली.
हा उपक्रम मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड, देशभक्तीची भावना व सर्जनशीलतेचा विकास घडून आला.
या उपक्रमामुळे शाळेचा परिसर देशभक्तीच्या आणि आनंदाच्या वातावरणाने भारावून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button