Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

पत्रकार संघाच्या कार्यात युवा पत्रकारांनी पुढे यावे.- विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील

जिल्हा पत्रकार संघातर्फे पी. एचडी. प्राप्त पत्रकारांचा सन्मान

जळगाव, दि. २० (जनसंवाद live): जळगाव जिल्हा पत्रकार संघाला १९८२ पासून उज्वल परंपरा लाभली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी पत्रकार संघाला भेटी देवून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतूक केले आहे. आम्ही (मी व अशोक भाटीया) यांनी आमची हयात पत्रकारांच्या कल्याणासाठी खर्ची केली आहे. पत्रकार भवन पत्रकारासाठीच आहे. युवा पत्रकारांनी पत्रकार संघाच्या कार्य पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे आज शहरातील डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

जैन उद्योग समूहाचे मिडीया प्रमुख अनिल जोशी, दैनिक देशोन्नती चे संपादक मनोज बारी, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे कार्यवाहक अशोक भाटीया, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी (पारोळा), जेष्ठ फोटोग्राफर पांडूरंग महाले, सारंग भाटीया, तेजमल जैन, गोकुळ सोनार, अशोक कुलकर्णी, अनंत वाणी, सुहास दुसाने, संजय निकुंभ, पत्रकार संघाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डाक्टरेट पदवी मिळविलेले ज्येष्ठ पत्रकार डाॅ. दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. सुभाष तळेले, ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त कुंदन पाटील यांचा जिल्हा पत्रकार संघातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करा: ज्येष्ठ पत्रकार डाॅ. दिलीप तिवारी म्हणाले, की पत्रकार संघाने सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. हा घरचा सत्कार आहे. आजोबा प्रगतीशिल शेतकरी होते. केळी उत्पादकांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. यामुळे त्यांचे जीवन किती कष्टप्रद आहे. याची जाणीव झाली. आणी त्यातूनच केळी पी.एचडी.चा विषय डोक्यात आला. शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा अभ्यास केला. शेती तंत्राचा अभ्यास केला. शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. ८९० पानांचा प्रबंध सादर केला. अनेक वर्ष पी.एचडी. करायला लागले. आज पत्रकारिता बदलत आहे. वृत्तपत्रांचे मालक पत्रकारांना कंत्राटीपध्दतीवर नेमते आहे. पत्रकारांच्या अनेक संघटना निघाल्या. मात्र जळगाव जिल्हा पत्रकार संघ हा एकमेव टिकून पत्रकारांच्या हक्कांसाठी भांडतो आहे.
सोशल मिडीयामुळे वृत्तपत्रांवर प्रभाव पडला आहे. यामुळे पत्रकारांनी विशेषता ज्येष्ठ पत्रकारांनी मोबाइल मधील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तरच ते पुढे टिकतील. सिटीझम रिपार्टर म्हणून ते पत्रकारिता करू शकतील. मोबाइलचा वापर स्मार्ट पध्दतीने करा.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डाॅ. सुभाष तळेले, ज्येष्ठ पत्रकार कुंदन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच योगायोगाने आज विजय बापू पाटील यांचा वाढदिवस असल्याने सर्वांनी शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button