महाराणा प्रताप विद्यालयात २३ वर्षा नंतर एकत्र आले वर्गमित्र

जळगांव, दि. 27 (जनसंवाद live): शहरातील प्रेम नगर येथील महाराणा प्रताप विद्यालयातील २००२ मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थीचा स्नेहमेळावा शनिवार दिनांक 25 रोजी प्रेम नगरातील महाराणा प्रताप विद्यालयात पार पडला. २३ वर्षानी एकत्र जमलेल्या वर्ग मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सारे रमुन गेले होते.
यावेळी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात विद्यालयाच्या सुमारे ७० माजी विद्यार्थीनींनी हजेरी लावली होती. २३ वर्षानंतर भेट झाल्यावर काहीना चेहरे ओळखीचे तर काहीनां अनओळखी भासले, नंतर परिचय देऊन शाळेतील आठवणी परस्परांच्या वाटचालीबद्दल गप्पा गोष्टी, खेळ आदी कार्यक्रमात दिवसभर रमुन गेले होते. सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला. विद्यालयातील मुख्याध्यापिका शर्मा मॅडम, मांडे मॅडम, सिरसाळ मॅडम, पि.एन.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महारू शिवदे, अमोल बारी, भिमराव भोरे, कमलाकर आहीरे, निलेश पाटील, विशाल सिसोदे, अजय वास्कर, यांनी पुढाकार घेतला.




