
जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी त्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आज मंडळ क्रमांक 5 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यर्पण करण्यात आले. तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमात मंडल क्रमांक 5 चे अध्यक्ष अतुल बारी, मा.नगरसेविका प्रतिभा पाटील, मा. नगरसेवक श्री डॉ. चंद्रशेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल सुरेश पाटील, मा. नगरसेवक सुरेश सोनवणे, मा. नगरसेवक विजय पाटील, माजी मंडलध्यक्ष शक्ती महाजन, उमेश सूर्यवंशी, आशिष सपकाळे, संकेत शिंदे, जयश्री पाटील ,भाग्यश्री पाटील, नितु परदेशी, शोभाताई कुलकर्णी, किरण भोई, सुभाष चौधरी तसेच परिसरातील अनेक महिला व पुरुष हे उपस्थित होते.




