महावितरण मधील विविध कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात, पुर्नरचनेतील त्रुटी दुर करण्याची संघटनांची मागणी

जळगाव, दि. 29 (जनसंवाद live): महावितरण मध्ये होत असलेल्या पुनर्रचनेत अनेक त्रुटी असून त्यासह ते लागू झाले तर सर्वस्थरावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेवर देखील विपरीत परिणाम होणार असल्याने सतरा कामगार संघटना एकत्रित येवून तयार झालेल्या ऊर्जा क्षेत्र संघटना संघर्ष मंच ने आंदोलन पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून आज महावितरण च्या जळगाव परिमंडळ कार्यालयाजवळ द्वारसभा घेण्यात आली.
सभेस बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम चे विजय सोनवणे, स्वप्निल सूर्यवंशी, चरण पांढरे ,अकबर शहा यांनी तर म.रा.स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी संघटनाचे एस के लोखंडे, सुरेश गुरचड, पराग बडगुजर व क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनाचे दिनेश बडगुजर यांनी संबोधित केले.
द्वारसभेत महावितरण मधिल विविध संवर्गाचे ३० ते ३५ टक्के असणाऱ्या रिक्त जागा भरणे, नवीन प्रस्तावित असलेले मंडळ, विभाग, उपविभाग, कक्ष यांना मंजुरी देणे, पूर्णरचेत होणारी कामगार कपात न करणे, कामाचे ८ तास निश्चित करणे, पुर्नरचनेतील ओ अँड एम तसेच बी अँड आर उपविभागातील विविध टीम मध्ये अत्यंत कमी कामगार स्टाफ आहे तो वाढविणे ई. मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाचे दिनांक १ ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम करणे व दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर प्रचंड निर्देशने व मंत्रालयावर मोर्चा असे स्वरूप राहणार आहे.




