
जळगाव, दि. 24 (जनसंवाद live): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजितदादा गट) जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष पदी ऐश्वर्या प्रशांत साळूंखे यांची निवड करण्यात आली. हि निवड युवती जिल्हा अध्यक्षा मोनालीताई पवार यांनी केली असून. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

ऐश्वर्या साळूंखे म्हणाल्या की सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी दिलेला सन्मान हा केवळ प्रतिष्ठेचा विषय नाही,
तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची आणि पक्ष संघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आहे.
पुढे त्या म्हणाल्या की मी शब्द देते “पक्षाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे, नि:स्वार्थी भावनेने आणि संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने काम करत राहीन.” तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे आणि पक्षाचा ध्वज उंच ठेवणे हीच माझी प्राथमिकता राहील.




