जळगावताज्या बातम्याशैक्षणिक
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी कौशल्य-२०२६ मेळाव्याचे आयोजन

जळगाव, दि.1 (जनसंवाद live): नवीन वर्षाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे विद्यार्थी कौशल्य-२०२६ मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यात आले.
याचप्रसंगी शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी पर्यवेक्षकांची निवड जाहीर करण्यात आली. प्राथमिक विभागासाठी श्री. निलेश पवार सर यांची, तर माध्यमिक विभागासाठी सौ. शितल कोळी मॅडम यांची पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली.
या दोन्ही नवनियुक्त पर्यवेक्षकांचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.




