Breaking
जळगावक्रिडा

पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न

जळगाव, दि.12 (जनसंवाद न्युज): पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. अंतिम सामना मुंबई विरुद्ध पुणे यांच्यात झाला खेळ संपण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी पुणे संघाची इशिता देबनाथ यांनी गोल केला त्या गोलच्या आधारावर पुणे संघाने मुंबई संघावर १-० ने विजय संपादन केला.

तृतीय स्थानासाठी कोल्हापूर विरुद्ध ठाणे यांच्यात अटा-तटीचा सामना झाला सामन्याच्या २७ मिनिटात ठाण्याची नेसा बोंद्रे हिने उत्कृष्ट गोल करून ठाणे संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे ठाणे तृतीय तर कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर राहिला

पारितोषिक वितरण समारंभ

पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी आमदार सौ. मधु जैन, जैन इरिगेशनचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षिका चंचल माळी,पिंच बॉटलिंग चे जफर शेख , जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख , डॉक्टर अनिता कोल्हे, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

अंतिम सामन्याच्या नाणेफेक व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी क्रीडा संकुल आला येऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेच्या नाणेफेक केले त्यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीच्या पत्रकार राजश्री चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक संघटने चे फारुक शेख व डॉक्टर अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती

उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार

कोल्हापूर विरुद्ध ठाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोल्हापूरची संस्कृती शिंगोटे तर अंतिम सामन्यातील मुंबईची अनुष्का मोहिते हिने पटकाविला.

टूर्नामेंट चे सर्वातकृष्ट खेळाडू

संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कृष्ट खेळाडू पुण्याची शर्वरी माने, बेस्ट स्कोरर मुंबईची प्रीशा विराल, बेस्ट गोलकीपर कोल्हापूरची आशावरी पाटील, बेस्ट डिफेंडर ठाण्याची न्यासा बोंद्रे.

अंतिम विजेत्यांना पारितोषिक

स्पर्धेतील विजय उपविजयी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावलेले पुणे, मुंबई ठाणे व कोल्हापूर या संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ब्रांझ पदक सहित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक ट्रॉफी, पदक व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.

कखेळाडूंना डॉक्टर अनिकेत पाटील व सौ मधु जैन यांनी अत्यंत सुरेख अशा शब्दात भावी आयुष्यासाठी खेळ व क्रीडांगण याचे महत्त्व विशद करून स्वतःचे अनुभव कथन केले व शुभेच्छा दिल्या.

पारितोषिक वितरण समारंभाचे समारोपिय प्रस्तावना जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी तर सूत्रसंचालन सरिता खाचणे व आभार प्रा.डॉअनिता कोल्हे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button