नालंदा बुध्द विहार समितीतर्फे महापरीनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

जळगाव, दि.6 (जनसंवाद live): विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमालती नगरातील नालंदा बुध्द विहार समिती व पंचशिला महिला विकास संस्थेतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरूवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून धम्मसेवक मुकेश जाधव यांनी उपस्थितांना सामुहिक बुध्द वंदना दिली. हा कार्यक्रम सकाळी 11: 30 वाजता सुरत रेल्वेगेट जवळ घेण्यात आला. अभिवादन झाल्यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, अनिल अडकमोल, शिवम सोनवणे, मेघना शिवम सोनवणे, विजय सुरवाडे, राजु निकम, कुंदन निकम, आनंद सपकाळे, योगेश निंबाळकर, दिपक माने, निलेश जाधव, गणेश फेगडे, सचिन सुरवाडे, निलेश पारेराव, कुणाल वानखेडे, पंकज पारेराव तसेच पंचशिला विकास संस्थेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




