दक्षा फाउंडेशन आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे स्वयंरोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

जळगाव, दि. 19 (जनसंवाद live): दक्षा फाउंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व तरुणांसाठी स्वयंरोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा २१ डिसेंबर २०२५ रविवार रोजी दुपारी १२ वाजता केशराई हॉल प्लॉट नंबर १ / गट नंबर 132 व्यंकटेश नगर हरी विठ्ठल नगर स्टॉप शेजारी, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
🗣 या मेळाव्यात काय मिळेल?
1) महिलांसाठी व तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी
2) PMEGP, मुद्रा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यांची माहिती.
3) बँक कर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रांवर थेट मार्गदर्शन.
4) जिल्हा उद्योग केंद्र व बँक प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद.
5) उद्योग सुरू करण्यासाठी योग्य दिशा व आत्मविश्वास.
का यावे?
👉 नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचा रोजगार उभारण्याची संधी.
👉एकाच ठिकाणी सर्व योजना, मार्गदर्शन व समुपदेशन.
👉 महिलांसाठी विशेष प्रोत्साहन व सवलतींची माहिती.
हा मेळावा आयुष्याला नवे वळण देण्याची संधी असुन याचा सर्व युवक युवतींनी व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आशिष सपकाळे व मिनाक्षी सपकाळे यांनी केले आहे.
📞 अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा : ८२०८४६८३१५ / ९८६०५९७६१५



