
जळगाव, ता. 9 (जनसंवाद live): नूतन मराठा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुमेध गाढे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे.
सुमेध गाढे याने आपल्या यशाचे श्रेय सातत्य, स्वअनुशासन आणि कठोर परिश्रम यांच्या योग्य समन्वयाला दिले आहे. सुमेध याने सांगितले की, महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन हे त्याच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले. त्याच्या या यशातून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. या यशाबद्दल नूतन मराठा महाविद्यालयातर्फे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी सुमेध याचा सत्कार केला आणि त्याच्या भावी प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील आणि प्रा. घनश्याम पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.




