
जळगाव, दि. 16 (जनसंवाद न्युज): रोटरी क्लब जळगाव आयोजित वारसा या फोटो – स्पर्धा प्रदर्शनाचा रिंग रोडवरील पु.ना. गाडगीळ कला दालनात नुकताच शुभारंभ करण्यात आला. या प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे छायाचित्रकार शैलेश पाटील, ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सय्यद, संधीपाल वानखेडे यांच्या हस्ते आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, विद्यार्थी सहाय्यक समितीचे प्रा. एस.एस.राणे, पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे, चित्रकार सचिन मुसळे व अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी बोलताना, बातमी इतकेच छायाचित्राला महत्त्व असते. एक फोटो म्हणजे एक अग्रलेख असेही म्हटले जाते. त्यामुळे काहीसे दुर्लक्षित असलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकारांकडे रोटरीने लक्ष देत स्पर्धा – प्रदर्शनाद्वारे यांचा केलेला सन्मान महत्त्वाचा आहे असे सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील केकी मूस यांनी टेबल टॉप प्रकारातील फोटोग्राफीची जगाला देणगी दिली आहे. फोटोग्राफी हा प्रतिभावंतांचा वसा आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्ष गिरीश कुलकर्णी , ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले. सुमित देशमुख यांनी रोटरीने दरवर्षी ही स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करावे तसेच निवडक छायाचित्रांची दिनदर्शिका प्रकाशित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर यांनी तर सूत्रसंचालन को – चेअरमन सुबोध सराफ यांनी केले. आभार संवाद सचिव पंकज व्यवहारे यांनी मानले.
कार्यक्रमास रोटरीचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, ॲड. श्रीकांत भुसारी, जितेंद्र ढाके, मकरंद डबीर, कमलेश चांदवानी, डॉ. पवन बजाज, वृत्तपत्र छायाचित्रकार आबा मकासरे, नितीन सोनवणे, गोकुळ सोनार, भूषण हंसकर, अभिजीत पाटील, जे.पी. वानखेडे, उल्हास सुतार यांची उपस्थिती होती.




