संत ज्ञानेश्वर विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून टीव्ही संच भेट

जळगाव, दि.२२ (जनसंवाद live): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक कार्यास चालना देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून टी व्ही संच सप्रेम भेट देण्यात आले. माजी विद्यार्थी उत्कर्षा सपके ,उर्वशी सपके, लीना माळी, पायल सोनगिरे, तेजश्री माळी, ऋतिका कासार, पल्लवी महाजन, भावेश पालवे, लकी सपके, श्याम चव्हाण, सुमित दुसाने, कार्तिक इंगळे, लोकेश वाघ, भाग्यश्री मिस्त्री, ऋतुजा वाणी या माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेला दोन टीव्ही संच भेट देण्यात आले. उपक्रमामुळे शाळेमधील अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. मुकेश नाईक यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, अशा उपयुक्त भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो, असे त्यांनी नमूद केले. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थित शिक्षक वृंदांनी व्यक्त केली.



