जळगावताज्या बातम्याशैक्षणिक
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अनोखा उपक्रम; “एक मूठ पक्षांसाठी”तून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जळगाव, दि. १२ ( जनसंवाद live): पक्ष्यांप्रती प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे राबविण्यात आला. “एक मूठ पक्षांसाठी” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरातून एक मूठ धान्य आणून शाळेच्या आवारात ठेवलेल्या दाणापात्रात टाकले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष कृतीतून पार पाडली.
मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दयाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
“एक मूठ धान्य… पण मोठा संदेश!” असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




