Breaking
जळगावताज्या बातम्या

जुनी पेन्शन लागु करण्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने

जळगाव, ता. १२ (जनसंवाद live): राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती शाखा-जळगाव यांच्या तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेवणाच्या सुट्टीत एक तास निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत विधानसभेत आश्वासन देऊनही अ‌द्याप आश्वासनाची पूर्ती केलेली नाही तसे सरकारची मानसिकता दिसून येत नसल्याने संघटनेच्या वतीने दिनांक-११ नोव्हेंबर २०२५ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी होणार होते. परंतू दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपाच्या कामात बहुसंख्य कर्मचारी कार्यरत असल्यामुळे व राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतच्या नियतकालिक निवडणूक जाहीर झाल्या असल्याने आचारसंहिता लागू झालेली आहे अशा स्थितीत लाक्षणिक संपासारखी कृती करणे अवघड आहे. त्यामुळे दिनांक:-११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारच्या भोजन सुट्टीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जळगाव जिल्हा समन्वय समितीच्या वतीने दुपारच्या भोजन सुट्टीत एक तास उग्र निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने कार्याध्यक्ष-वासुदेव जगताप व कोषाध्यक्ष – घनःश्याम चौधरी, अध्यक्ष- मगन पाटील यांची भाषणे झाली राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मागण्या मान्य करावे अशी विनंती करण्यात आली. जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना व संयुक्त समन्वय समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. मगन पाटील, सरचिटणीस श्री. योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष- श्री. वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष- घनःश्याम चौधरी राज्य संघटक तथा उपाध्यक्ष अमर परदेशी, दिपक चौधरी, हर्षल दांडेकर लढाप्रमुख – राजेश रेणूके, संघटक- योगेश कोकरे, राकेश जाधव, जयप्रसाद देवरे, सुनिल कदम, श्रीमती शुभांगी बिऱ्हाडे मॅडम, मनिष जाधव व सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रतिनिधि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button