Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जळगाव, दि. १७ (जनसंवाद live): सालाबादप्रमाणे यावर्षीही विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने गुणगौरव सोहळा २०२६ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात परिसरातील उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल राजेंद्र देशमुख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्ञानसागर क्लासेसचे संचालक संतोष पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील, पंकज रायसिंग, निलिमा पाटील मॅडम आणि संस्कृतच्या पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीतेश पवार, ऋषिकेश राजपूत, अविनाश पाटील, ऋषिकेश पवार, पार्थ बोरसे, अमोल ढाकणे, चेतन राजपूत, आशिष राजपूत, मनीष चौधरी, मयुर डांगे, अजय मांडोळे, अभिजित राजपूत, गौरव डांगे, संकेत म्हस्कर, कुणाल जुमडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button