Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

मराठी पत्रकार संघाच्या डिजीटल मिडीया विभागाच्या महानगर अध्यक्षपदी विक्रम कापडणे

जळगाव, दि. २९ (जनसंवाद live): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव महानगर अध्यक्षपदी लोकटाईम न्युजचे संपादक विक्रम कापडणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विक्रम कापडणे यांनी गेले काही वर्ष जळगावमधील स्थानिक केबल वाहिनी ‘साई व्हिजन’ अंतर्गत ‘बालाजी न्यूज’ चॅनेलपासून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक मीडियापासून ते प्रेस फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांत त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. सध्या ‘लोक टाइम’ या वेब पोर्टलचे ते संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी आहे, या काळात विक्रम कापडणे हे संघटनेच्या डिजिटल मीडिया विभागाचे नेतृत्व करणार आहेत. संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी सक्रिय व प्रभावी भूमिका बजावावी, तसेच पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी नियुक्तीपत्राद्वारे कापडणे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे जळगाव महानगरातील डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना नवी दिशा मिळेल, असा विश्वासही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button