Breaking
जळगावआरोग्यताज्या बातम्या

अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगाव, दि.२१ (जनसंवाद live): येथील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अँडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ‘अँन्युरिझम’ या अत्यंत गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रसिद्ध इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने खानदेशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला नवजीवन दिले आहे.

​रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ‘एमआरआय’ आणि ‘डीएसए’ तपासणीदरम्यान रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला मोठा फुगा (अँन्युरिझम) झाल्याचे निष्पन्न झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत तीव्र रक्तस्राव होऊन अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. निलेश किनगे यांनी कोणतेही ओपन ब्रेन सर्जरी न करता केवळ मांडीच्या धमनी द्वारे मेंदूत पोचून ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर स्टॅट बसवून’ यशस्वीरीत्या आधुनिक न्यूरो इंटरनॅशनल शस्त्रक्रिया केली. अत्याधुनिक स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह फुग्यामध्ये न जाता थेट मुख्य रक्तवाहिनीतून सुरू झाला, ज्यामुळे अँन्युरिझमचा फुटून रक्तस्राव होण्याचा धोका पूर्णपणे टळला या उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे सुखरूप असून आज डिस्चार्ज देण्यात आला. या या पूर्ण प्रोसिजरमध्ये डॉक्टर विनोद किंनगे भूलतज्ञ यांचे अमूल्य सहकार्य लाभले. खान्देशातच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेंशनल सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या दूरच्या शहरांत जाण्याची गरज नाही, असे मत डॉ. निलेश किनगे यांनी व्यक्त केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. किनगे व अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button