Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

नागरिकांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेतर्फे टोल फ्री क्रमांक, घरबसल्या नोंदवता येणार तक्रार, महापौर दीपमाला काळे यांची संकल्पना.

जळगाव, दि. १२ (जनसंवाद live): जळगाव शहरातील नागरिकांना आता आपल्या किरकोळ तक्रारी आणि समस्यांसाठी महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी आणि त्रासातून सुटका करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या संकल्पनेतून एक विशेष टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ००१५ सुरू करण्यात येत आहे. येत्या सोमवार, दिनांक १३ जुलैपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

घरबसल्या नोंदवता येणार तक्रार
महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, अनेकदा नागरिकांना लहान-सहान नागरी समस्यांसाठी मनपा कार्यालयात प्रत्यक्ष यावे लागते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. यावर तोडगा म्हणून महापौर कार्यालयाने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिक १३ जुलैपासून १८०० २३३ ००१५ या क्रमांकावर सकाळी १० ते ६ (सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधून घरबसल्या आपल्या तक्रारी किंवा समस्या नोंदवू शकतील.

तक्रारींचे होणार त्वरित निवारण
या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची त्वरित नोंद घेतली जाईल. त्यानंतर संबंधित तक्रार तात्काळ जळगाव मनपाच्या संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येईल आणि त्यावर वेगाने कार्यवाही करून समस्येचे निवारण केले जाईल, अशी माहिती महापौर कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

“नागरिकांनी मनपा कार्यालयात न येता या घरबसल्या मिळणाऱ्या सुविधेचा आणि टोल फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button