Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते २०० बियांचे बीजारोपण

जळगाव, दि. २ (जनसंवाद live): १ जुलै ते ७ जुलै या पर्यावरण सप्ताहा निमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या हस्ते कागदी कपांमध्ये २०० बियांचे बीजारोपण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः कागदी कपांमध्ये माती भरून विविध वृक्षांच्या व फुलझाडांच्या बियांची पेरणी केली. बीपासून रोप तयार होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.

बीजारोपणानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः पेरलेले बीज घरी नेऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धनाची जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगून प्रत्येकाने किमान एक तरी रोप वाढविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित पालकांनी आणि नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button