Breaking
जळगावताज्या बातम्याराजकीय

विशाल पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर प्रकोष्ठ सरचिटणीस पदी नियुक्ती

जळगाव, दि. २५ (जनसंवाद live): भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर जिल्हा पदवीधर प्रकोष्ठ सरचिटणीस पदावर विशाल रमेशचंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याबाबत आमदार राजुमामा भोळे, यांनी अभिनंदन केले आहे.

सदर नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात व विभाग संघटनमंत्री रवि अनासपुरे, पदवीधर प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष धनराज विसपुते, खा. स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची पावती म्हणूनच पक्षाने त्यांच्याकडे ही महत्वाची संघटनात्मक जबाबदारी दिलेली आहे. यापुढे आपण असाच किंबहुना यापेक्षाही जास्त वेळ संघटनात्मक कार्यासाठी देऊ असे ते म्हणाले.

राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, अंत्योदय, मूल्याधारित राजकारण या भाजपच्या विचारधारेवर गाढ विश्वास ठेवून, पक्ष शिस्त, संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीचे अनुपालन करीत आपण कार्यस्त राहू असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार तायडे, महापौर दीपमाला काळे, महानगर चिटणीस आशिष सपकाळे, जिल्हा चिटणीस दिपक परदेशी, जिल्हा महिला अध्यक्ष नितू परदेशी, नितीन इंगळे, भूषण लाडवांजरी, नगरसेविका राणे, आदिंनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button