Breaking
चोपडाजळगावताज्या बातम्यावैद्यकीयसामाजिक

खान्देशच्या सुपुत्राचा मराठवाड्यात सन्मान, डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार देऊन गौरव

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ (जनसंवाद live): जळगांव जिल्यातील चोपडा येथील “वामन अॅक्युपंक्चर अॅड नॅचरोपॅथी केंद्राचे” डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे यांना त्यांच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १९ जुलै रोजी संपन्न झाला.

आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन ही आयुर्वेद, योग, सिध्दा, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर, आणि निसर्गोपचार अश्या सात चिकित्सा पद्धतींना एकत्रीत घेऊन कार्य करणारी भारतातील एक अग्रगण्य रजिस्टर संस्था आहे. आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन आणि (AGMA) यांचा वतीने अॅक्युपंक्चर अॅड नॅचरोपॅथी चा प्रचार प्रसार करणारे उपचारकांची दखल घेत त्यांचा गौरव करत असते. डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे हजारो रूग्णांची जळगांव जिल्ह्यात सेवा केली आहे. आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएयन आणि (AGMA)यांचा वतीने “महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026” चा प्रतिष्ठेच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेकलावंत डाॅ. सुयोग गोरेंद्र, अॅड. नाझिर काझी (प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) अॅड. दत्तात्रय जाधवर, अॅड. नागेश सोनुने यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती चेअरमन डाॅ. सतिष कराळे, व्हाईस चेअरमन डाॅ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. बाबुराव कानडे, डाॅ. अभिजीत कवठकर, डाॅ. प्रशांत सावंत, डाॅ. दिशा चव्हाण, डाॅ. स्मिता खारकर, डाॅ. विनोद ढोबळे, डाॅ. सारंग फुके, डाॅ. श्रीधर मेश्राम, डाॅ. राजेंद्र गोरे, डाॅ. तुषार वाघुळदे, डाॅ. विजय पाटील. यांच्या सह AIMA / AGMA चे पदाधिकारी आणि अनेक वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button