सुनील भंगाळे यांच्या मास्टीफ सिल्व्हर इन हॉटेलचा आज शुभारंभ

जळगाव, दि.२९ (जनसंवाद live): जळगाव येथील व्यावसायिक सुनील भंगाळे यांच्या मास्टीफ सिल्व्हर इन हॉटेलचे आज रविवार, दि. २९ मार्च रोजी दुपारी ४:३० वा. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह जळगाव महापालिकेचे महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरींसह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थिती देण्याचे आवाहन सुनील भंगाळे यांच्यासह भंगाळे परिवारातील सदस्यांनी केले आहे.
जळगाव शहरात भंगाळे परीवाराचा हाॅटेल व्यवसाय खुप आधीपासून आहे, शहरात भंगाळे परीवाराच्या आठ ते दहा हाॅटेल्स असून मुंबई येथील मास्टीफ ब्रॅन्ड सोबत टायप असल्याने जळगावकरांना उच्च दर्जाची सेवा मिळणार आहे. या व्यतिरिक्त भंगाळे परीवाराचा गोल्ड आणि सिल्क साड्यांचा सुध्दा व्यवसाय आहे.




