Breaking
जळगावउद्योगऔद्योगिकताज्या बातम्या

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जळगाव/मुंबई दि.१५ (जनसंवाद live): जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी निकालांवर भाष्य करताना महसूल, नफा आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ झाल्याचे सांगितले. जैन हिल्स येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर चौथ्या तिमाहीचा निकाल जाहिर करण्यात आला.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ‘हाय-टेक’ आणि ‘अॅग्रो प्रोसेसिंग’ विभागांच्या मजबूत कामगिरीमुळे कंपनीने वार्षिक तुलनेत ४.३ टक्के एकत्रित महसूल वाढ नोंदवली. प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीने २३३ कोटी रुपयांची रोख निर्मिती केली असून, ती EBITDA च्या जवळपास ९७ टक्के इतकी आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता, कंपनीने एकत्रित महसुलात दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील एकत्रित EBITDA ८०९ कोटी रुपये इतका असून, तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२.८ टक्क्यांनी अधिक आहे. खेळत्या भांडवलाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे कंपनीच्या खेळत्या भांवडला मध्ये सुधारणा झाली असून, कंपनीला ६१९ कोटी रुपयांचा रोख निर्मिती करण्यात यश आले आहे. ही रक्कम EBITDA च्या सुमारे ७६ टक्के इतकी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

भविष्यात महसूल वाढीचे लक्ष्य – अनिल जैन
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनी सध्या बदलत्या जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कच्च्या मालाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवाहावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी धोरणांमधील सातत्य तसेच सिंचन आणि पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च यामुळे बाजारातील मागणीला चालना मिळेल असे अपेक्षित आहे. भविष्यात महसूल वाढ, प्रकल्पांमधील येणी वसुली सुधारणा आणि शाश्वत मुक्त रोख प्रवाह निर्माण करण्यावर कंपनीचे विशेष लक्ष्य राहणार असल्याचेही कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button