विचार वारसा फाउंडेशनच्या गणेशोत्सव २०२६ च्या कार्यकारिणीची घोषणा, आशिष राजपूत अध्यक्ष तर गौरव डांगे उपाध्यक्षपदी!

जळगाव, दि. ६ (जनसंवाद live): विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव २०२६ साठी नवीन अधिकृत कार्यकारणीची घोषणा अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सर्वसंमतीने या नव्या टीमची निवड झाली आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सवाचे नेतृत्व आशिष भरतसिंग राजपूत (अध्यक्ष) यांच्याकडे सोपवण्यात आले असून गौरव डिगबर डांगे (उपाध्यक्ष) आणि संकेत संजय म्हसकर (सचिव) म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
नवनियुक्त कार्यकारीणी:
अध्यक्ष: आशिष भरतसिंग राजपूत
उपाध्यक्ष: गौरव डिगबर डांगे
सचिव: संकेत संजय म्हसकर
कार्याध्यक्ष: आकाश तोमर
सहकार्याध्यक्ष: करण गरुड, कैलास पाटील, राकेश मराठे (मामा)
कोषाध्यक्ष: चेतन राजपूत
सहकोषाध्यक्ष: ऋषिकेश राजपूत, योगेश धनगर
खजिनदार: अमोल ढाकणे
सहखजिनदार: अजय मांडोळे, राहुल पाटील
सह सचिव: अविनाश पाटील, कुणाल सोनार
सल्लागार आणि संघटक मंडळ:
प्रमुख सल्लागार: मनीष चौधरी, गीतेश पवार
सल्लागार: मयूर डांगे, अभिजीत राजपूत
संघटक: ऋषिकेश पवार, पार्थ बोरसे
सहसंघटक: कुणाल जुमडे, तेजस पाटील
माध्यम आणि प्रसिद्धी विभाग:
मीडिया प्रमुख: गणेश सानप, सोनवणे, निखिल शेलार, राकेश कोळी, कृष्णा पाटील
कार्यकारणी सदस्य:
शुभम निकम, मितेश वाघ, आकाश दिनकर राजपूत, अमोल पनाड, अक्षय गवई, हर्षल निकम, आकाश पवार, कार्तिक जोशी, पार्थ वाघ, कल्पेश मराठे, करण तायडे, लोकेश निकम, सोपान जाधव, युवराज राजपूत आणि लोकेश पाटील.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गणेशोत्सव २०२६ नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहात, सामाजिक उपक्रमांची जोड देऊन आणि शिस्तीत पार पाडण्याचा संकल्प या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सर्व स्तरांतून नव्या कार्यकारणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





