उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रिप्राळा स्मशान भूमीला भेट, शेड व वॉचमन खोली बांधण्याचे उपमहापौरांचे निर्देश

जळगाव, दि.६ (जनसंवाद live): उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी पिंप्राळा येथील स्मशान भूमिला भेट देऊन तेथील परिस्थिती आणि आवश्यक सोयी सुविधा यांची पाहणी केली. त्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी आणि आवश्यक उपाययोजना यांबाबत संबधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.
सपुर्ण पिंप्राळा उपनगर तसेच सभोवतीच्या अनेक वस्ती- कॉलनी भागात अंत्यसंस्कारासाठी पिंप्राळा स्मशानभुमी ही जवळची व सोयीची आहे. मात्र देखभाली अभावी ही स्मशानभुमि अनेक समस्यांनी ग्रस्त झालेली असल्याची तक्रार जिल्हा पालक मंत्र्यांपर्यत पोहोचली होती. त्यानंतर जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदेश दिल्याने उपमहापौरांनी गुरूवारी सकाळी या स्मशान भूमिला प्रत्यक्ष भेट दिली. नगरसेवक नरेंद्र पाटील, अमर जैन, कविता सागर पाटील, कविता किरण शिवदे, जाकीर पठाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, विजय चौधरी यांच्यासह अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि संबधित मनपा अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सुरक्षा रक्षक नेमणे, रक्षक गृह तसेच शेड बांधणे, आलेल्या लोकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था उभारणे, झाडे लावून परिसर सुशोभित करणे, वाढलेली अनावश्यक काटेरी झुडपे काढणे, तसेच नियमित साफसफाई, इत्यादीआवश्यक असलेल्या कांमांची यादी बनवून, त्याबाबत काम तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.




