अध्यात्मिकजळगावताज्या बातम्या
श्री सुखेश्वर महादेव मंदिराला उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट

जळगाव, दि.१७ (जनसंवाद live): जळगाव शहरातील निमखेडी रोडवरील सहयाद्री कॉलनी येथील श्री सुखेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जळगाव शहराचे उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक डाॅ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका प्रतिभा गजानन देशमुख, नगरसेविका जयश्री राहुल पाटील यादी मान्यवर होते. यावेळी भजन, किर्तन, आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सामाजीक एकोपा, धार्मीक परंपरा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक उर्जा निर्माण होते.



