Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार.- मा.आमदार श्री.राजूमामा भोळे

जळगाव, दि.६ (जनसंवाद live): कोविड काळात सेवा बजाविलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कंत्राटी स्वरूपात कायमस्वरूपी सामावून घेण्याकरीता अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणे बाबत मा. आ. श्री. राजूमामा भोळे यांना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन यांच्या तर्फे दि. २ मार्च २०२६ रोजी निवेदन देवून विनंती केली. यावेळी मा.आमदार श्री. राजूमामा भोळे यांनी कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.

कोविड-१९ महामारी कालखंडात कोविड बाधितांच्या जवळ सुश्रुषा करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक देखील जवळ येण्यासाठी धजावत नव्हते. जगभरातील व देशभरातील सर्व जनता यावेळी आपला जीव मुठीत धरून आपआपल्या परिने आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. अशा जीवघेण्या कठीण कोविड विषाणूच्या महामारीत कुणीही घराच्या बाहेर निघत नसतांना राज्य शासनाने जनतेला आवाहन केले होते.

कंत्राटी कोविड योद्धा यांनी राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत कंत्राटी कोविड योद्धयांनी स्वतःची व परिवाराच्या जिवीताची पर्वा न करता जीव धोक्यात घालून कोविड काळात कंत्राटी स्वरूपात सेवा बजावलेली आहे.

केंद्र व राज्य शासनाने देखील या कोविड योद्धयांचे गौरव,कौतुक, सन्मान केला होता.
कोविड योद्धयांनी कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात केलेल्या सेवा कार्याचा शासनाला विसर पडलेला दिसत असल्याची कंत्राटी कोविड योद्धयांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह अन्य विभागात कंत्राटी स्वरूपान वॉडबॉय(कक्षसेवक), बेड सहाय्यक,डॉक्टर,नर्सेस, ॲब्युलन्स चालक,आया, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदिंनी कोविड काळात काम केलेले होते.
परंतू कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर कोविडची लाट आटोक्यात आल्यानंतर या कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे.

कंत्राटी कोविड योद्धयांनी केलेल्या कार्याच्या व अनुभवानुसार राज्य शासनाच्या विविध विभागात जसे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा,पंचायत समित्या,महानगरपालिका, नगरपालिका,नगरपरिषदा,
तहसिल कार्यालये, शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालये,रेल्वे विभाग,बसस्थानक,शाळा, महाविदयालये, खाजगी नामांकित कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणि मनुष्य बळाची कमतरता देखील भासत असल्याने या ठिकाणी मनुष्य बळ वाढवून या कोविड-१९ महामारीत सेवा बजाविलेल्या कंत्राटी कोविड योद्धयांना कमी करण्यात आलेले अजून कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना नव्याने कंत्राटी तत्वावर कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याकरीता अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडून कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारांना न्याय मिळवून दयावा अशा स्वरूपाची विनंती मा.आमदार श्री. राजूमामा भोळे यांना निवेदनाच्या माध्यमातून जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे करण्यात आली. या कंत्राटी कोविड योद्धयांचा मागण्यासंदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडण्यात येणार असल्याचे यावेळी आश्वासन मा. आ. श्री. राजूमामा भोळे यांनी दिले. यावेळी आमदार महोदयांनी कंत्राटी कोविड योद्धयांच्या विषयाबाबत सकारात्मक चर्चा देखील केली.

यावेळी- निलेश बोरा, रमेश वानखेडे उपस्थित होते.
तसेच निवेदनावर निलेश बोरा, रमेश वानखेडे, प्रेम वानखेडे, बबन सावळे, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, कृष्णा सावळे, हेमंत बिऱ्हाडे यांनी निवेदनावर स्वाक्षरी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button