Breaking
जळगावताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी

जळगाव, दि. १८ (जनसंवाद live): श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात’ प्राथमिक विभागातर्फे येथे गुढीपाडव्याला ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ हा अमूल्य संदेश देणारी चिमणी संवर्धनाची गुढी उभारली गेली. शाळेमधील इको क्लब तर्फे पर्यावरणातील पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आदीचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे, यासाठी इको क्लब प्रयत्नशील आहे. उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी मार्गदर्शन केले जाते तसेच टाकाऊपासून टिकाऊ अशी नैसर्गिक घरटी बनवून त्या घरट्यांचे वाटपही केले जाते.

श्री. संत ज्ञानेश्वर शाळेमधील इको क्लब तर्फे दिलेल्या हाकेला शाळेतील विद्यार्थी व पालकांकडून कडून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेली जाणीवजागृती दिसून आली. याबद्दल घेतलेला पुढाकार निश्चितच चिमण्यांची संख्या वाढीसाठी पोषक ठरेल असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. नेहमी पर्यावरण पूर उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांचाच मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button