जळगावात धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा, भन्ते डॉ. एन. आनंद महाथेरो यांनी उपस्थितांना दिले त्रिशरण, पंचशील

जळगाव, दि. १४ (जनसंवाद live): १४ ऑक्टोबर १९५६ रोजी परमपुज्य, बोधिसत्व, विश्वरत्न, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायाना नागपुर येथे धम्मदीक्षा दिली होती. म्हणून हा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. रक्त न सांडता डाॅ. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली, त्यांनी आपल्या अनुयायांना बुद्धाचे पंचशील आणि स्वतः तयार केलेल्या २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत.

जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज सकाळी माजी प्राचार्य यशवंतराव मोरे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, प्रा. प्रीतीलाल पवार, प्रा. बापुराव पानपाटील, प्रा. साहेबराव बागुल आणि माजी शिक्षण प्रशासन अधिकारी हरिश्चंद्र सोनवणे यांनी माल्यार्पण केले.
पूज्य भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो, यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. पुढे ते म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले बुद्धाचे पंचशील आणि स्वतः तयार केलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन केले पाहिजे. १४ऑक्टोबरच धम्मदीक्षा दिवस साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.
मा. प्राचार्य यशवंतराव मोरे म्हणाले की आपण धम्माच्या कार्यक्रमांना पांढऱ्या वस्त्रातच यावे, दोघांचेही कपडे पांढरे हवेत, एक रंगीत, एक पांढरे असे करू नये. सोबत पतिपत्नी दोघांनी यावे दोघांनीही धम्माचरण करावे.
सदर कार्यक्रमास चेतन नन्नवरे, आर. के. सुरवाडे, शालिक पानपाटील, नागोजी सोनवणे, रेखा सोनावणे, कांता बागुल, ज्योत्स्ना मोरे, रंजना पगारे, किशोर पगारे, वसंत सपकाळे, महेंद्र सोनवणे, बळवंत भालेराव, सिद्धार्थ सोनवणे, शैलेश सोनवणे, बाबुराव इंगळे, श्रीकांत तायडे, प्रा. तायडे, कैलास तायडे, सी.आर. सोनडवले नागपूर, करुणा सोनवणे, सोनू तायडे, अभय सोनवणे, सम्यक इंगळे आदी उपस्थित होते. हरिश्चंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन चेतन नन्नवरे यांनी केले.





