भजन संध्या कार्यक्रमाला भाविकांची तुफान गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांची साई मंदिराला भेट

जळगाव, दि. 26 (जनसंवाद live): ब्रम्होत्सवाच्या दुसर्या दिवशी इंडियन ऑयडाॅल गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा भजन संध्या हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी बसण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती. बसण्यासाठी सोफा, गादी, तसेच खुर्ची यांची व्यवस्था होती. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी साईबाबा यांच्या गाण्यासह अनेक भक्तीगीत आणि भजन गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
जळगाव शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यामध्ये जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, इत्यादी प्रतिष्ठित नागरिक होते. माध्यमांशी बोलताना अशोक जैन म्हणाले की झवर परीवाराने या परीसरात मंदिर बांधुन अध्यात्मिक विकास केला आहे.

आज शुक्रवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा महाभिषेक होईल तर दुपारी चार वाजता महाप्रसादाने ब्रम्होत्सवाचा समारोप होईल.




