Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

महानायिकांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन

जळगाव, दि.७ (जनसंवाद live): राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा बी आणि माता रमाई या महानायिकांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या माध्यमातून उद्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ४:०० या वेळेत अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनास राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राज्य कार्याध्यक्ष संध्याताई गवई या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर संमेलनाचे उद्घाटन बारी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायाताई बारी या करणार आहेत. प्रस्तुत संमेलनात ‘महानायिकाच्या जीवनसंघर्षातून प्रेरणा घेऊन महानायिकाचे अपूर्ण काम पूर्ण करणे’/महिलांचे राष्ट्रव्यापी संघटन बनवल्याशिवाय महिलांच्या समस्यांचे समाधान होणार नाही. ’या विषयावर चर्चा होणार असून विशाखा पाटील, रेखा देशमुख, शीला पाटोकर, रिंकीताई यादव, प्रा.मीनाक्षी कांबळे, फर्जना बी. शेख, जेबा परवीन शेख, प्रा.मनीषा देशमुख, जयश्रीताई इंगळे, यशोदाताई तायडे इ. मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button