Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

टाकाऊ कागदांपासून विद्यार्थ्यांनी बनवल्या उपयुक्त वह्या, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा पर्यावरण पुरक उपक्रम

जळगाव, दि.२१ (जनसंवाद live): मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनविन उपक्रम राबवित असते, शाळेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा “जुने कागद – नवी वही” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरातील व शाळेतील वापरलेले जुने कागद गोळा करून त्यापासून सुंदर व उपयुक्त वह्या तयार केल्या.

या वेळी पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कागदांची छाननी, कापणी व बांधणी करून आकर्षक वह्या तयार केल्या. तयार वह्यांचे प्रदर्शनही शाळेत आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय रुजली असून पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत “कचरा नाही, संसाधन आहे” हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button