Breaking
जळगावताज्या बातम्यासमाजकारणसामाजिक

आशिष सपकाळे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ प्रदान

जळगाव, दि. ५ (जनसंवाद live): संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगाव येथील आशीष उत्तमराव सपकाळे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.

हा पुरस्कार तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रसिद्ध विधितज्ञ आमदार श्री सुधीर तांबे, डॉ मुकुंद भरसकाके, श्री संघराज रुपवते, आमदार डॉ. किरण लहामते, आदि उपस्थित होते .संविधान मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक जनजागृती, विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आशीष सपकाळे यांनी हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील नागरिक, सहकारी कार्यकर्ते व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आशीष सपकाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button