Breaking
जळगावताज्या बातम्याराजकीय

भुसावळचे अनिल चौधरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात

जळगाव, दि.१६ (जनसंवाद live): भुसावळ येथील अनिल चौधरी यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो समर्थक, नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

“हा केवळ अर्ज नसून अनेक वर्षांपासून जपलेल्या मैत्रीचा, कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा आणि जनतेच्या प्रेमाचा सन्मान आहे. राजकारणात पदापेक्षा माणसे मोठी असतात,” असे चौधरी म्हणाले.

भाजपविरोधी वातावरण असल्याचा दावा करत जिल्ह्यातील सुमारे 300 नगरसेवकांचा पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पक्षांतील व अपक्ष लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद मिळत असल्याने चुरशीची लढत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची भूमिका आणि अपक्षांची ताकद यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button