Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात योग व आहार विषयक मार्गदर्शन

जळगाव, दि. १९ (जनसंवाद live): इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन दिल्ली, यांच्या वतीने मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग व आहार विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात डॉ. निशिगंधा नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संतुलित आहाराचे महत्त्व, पौष्टिक अन्नाचे सेवन, तसेच निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. कार्तिकेय अट्रावलकर यांनी योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

मार्गदर्शना दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्या बाबत जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक,15 शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच 300 विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button