Breaking
सामाजिकजळगावताज्या बातम्या

आशिष सपकाळे यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश भुषण गवई यांची घेतली सदिच्छा भेट

जळगाव, दि. ८ (जनसंवाद live): भारताचे माजी सरन्यायाधीश तथा कायदेपंडित मा. श्री भूषणजी गवई यांची जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, जळगावचे माजी अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी आशिष सपकाळे यांनी माननीय भुषण गवई यांना एक पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

या भेटीदरम्यान जळगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांवर मा. गवई यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजहित, सामाजिक परिवर्तन, कायद्याविषयी जनजागृती आणि जळगाव शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

या प्रसंगी जळगाव शहरातील कायदेतज्ज्ञ श्री राजेश झाल्टे तसेच सामाजिक नेते श्री मुकुंद सपकाळे हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेली ही भेट अत्यंत आत्मीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी ठरली.

माजी न्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे सामाजिक प्रश्नांकडे अधिक व्यापक आणि विधायक दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. तसेच जळगाव शहराच्या सामाजिक आणि वैचारिक उन्नतीसाठी अशा संवादांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ही सदिच्छा भेट जळगाव शहरासाठी अभिमानास्पद ठरली असून, माननीय गवई साहेबांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button