मी सावली भिमाची एकपात्री नाट्यप्रयोगाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

जळगाव, दि. १२ (जनसंवाद live): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शरद भालेराव यांनी जळगाव येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्वलंत इतिहास सांगणारा मी सावली भिमाची हा एकपात्री नाट्य प्रयोग सतत २५ तास सादर केला होता. याची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये मी सावली भिमाची या एकपात्री नाट्यप्रयोगला दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात झाली, आणी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजुन ३० मिनिटांनी प्रयोग बंद झाला. १ तास २० मिनिटांचा एक प्रयोग. असे एकूण २२ प्रयोग सतत २५ तास सदर करून मी सावली भिमाची या एकपात्री प्रयोगाने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
या आधी शरद भालेराव यांनी रांगोळी तुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १७ हजार स्क्वेअर फूटाचे पोर्ट्रेट काढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. मी सावली भिमाची हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपले दुसरे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. जळगाव जनता बँकेचे कर्मचारी शरद भालेराव यांच्या विश्व विक्रमाचे कौतुक सर्वत्र होत असुन जळगाव चे आमदार मा. राजुमामा भोळे यांनी कौतुक केले. “विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल सोबत सन्मान चिन्ह नुकतेच इंटरनॅशनल बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून शरद भालेराव यांना प्राप्त झाले आहे.” या रेकॉर्ड साठी किशोर सुर्यवंशी, तसेच नुतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. एल. पी. देशमुख सर. , दिग्दर्शक चिंतामण पाटील, प्रबुद्ध भालेराव, विलास यशवंते , हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव , कुलदीप भालेराव , वैभव सोनवणे , संजय सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.





