हरी ओम नगर मित्र मंडाळाच्या मुलींचा कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक, अध्यक्ष योगेश साळी यांचे लाभले मार्गदर्शन

जळगाव, दि.२७ (जनसंवाद live): कानळदा रोडवरील हरी ओम नगर मित्र मंडळातर्फे गेल्या दोन वर्षांपासून परीसरातील मुला मुलींसाठी कराटे प्रशिक्षण सुरू केले आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश साळी यांनी पुढाकार घेऊन हा क्लास सुरू केला असून महिला कराटे प्रशिक्षक म्हणून करिष्मा अहिरे या मुलींना शिकवत असतात. मुलीवर अतिप्रसंग घडलाच तर प्रत्येक मुलीने आपले संरक्षण स्वतः केले पाहिजे, तीला कुणाच्या मदतीची गरज न पडता तीने समोरच्या सोबत दोन हात करून स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे असा उद्देश मंडळाचे अध्यक्ष योगेश साळी यांचा असल्याचे त्यांनी सांगीतले. या कराटे क्लास मध्ये ५ वर्षांपासून ते ३० वर्षाच्या मुला मुलींचा सहभाग असुन साधारण ५० विद्यार्थी या क्लास मध्ये आहेत. या विद्यार्थ्यांना आर. आर. शाळेचे डिगंबर महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभत असते.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे नुकत्याच पार पडलेल्या स्वतंत्र्य दिनानिमित्त कराटे स्पर्धेत मुलींनी सहभाग घेतला होता यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कराटे प्रशिक्षक डिगंबर महाजन, अजय काशीद, महिला कराटे प्रशिक्षक करिष्मा अहिरे, नामदेव वाघ, अतिश सोनवणे, अनिल साठे, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. जामनेर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत मुलींनी विजय संपादन करून दुसरा क्रमांक पटकावला होता. जिल्हास्तरीय स्पर्धा असो कि राज्यस्तरीय प्रत्येक स्पर्धेत मुली सहभागी होतात.





