Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ रंगभरण स्पर्धा उत्साहात

जळगाव, दि. २९ (जनसंवाद live): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या विषयावर रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध चित्रांमध्ये आकर्षक रंग भरत विद्यार्थ्यांनी मुलींचे शिक्षण, समानता, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचा संदेश प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कलागुणांना या उपक्रमातून सुंदर व्यासपीठ मिळाले.

कार्यक्रमाला शीतल कोळी यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना चालना मिळाली. स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button