Breaking
जळगावताज्या बातम्यासामाजिक

भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर तर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधन सप्ताह संपन्न

जळगाव, दि. १४ (जनसंवाद live): भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर तर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहामध्ये ११ एप्रिल रोजी संविधान जागर यात्रा, १२ एप्रिल रोजी संत चोखामेळा बोर्डिंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच अन्नदान वाटप, १३ एप्रिल रोजी शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि १४ एप्रिल रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले.

यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे(राजु मामा), भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दिपक सूर्यवंशी, महापौर सौ. दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते श्री. नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालाणी तसेच मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष अजित राणे, आनंद सपकाळे, विनोद मराठे, अतुल बारी, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संयोजक व जिल्हा महानगर चिटणीस आशिष सपकाळे यांनी केले तर जिल्हाउपाध्यक्ष व कार्यक्रम सहसंयोजक ज्योती निंभोरे, अनुसूचित जाती जिल्हा महानगर संयोजक तसेच कार्यक्रम सह संयोजक मनोज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी बिऱ्हाडे आदींनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button