Breaking
ताज्या बातम्याजळगावसामाजिक

१७ सप्टेंबर “राष्ट्रीय श्रमिक दिन” घोषित करावा, भारतीय मजदूर संघाची मागणी

जळगाव, दि. १५ (जनसंवाद live): १७ सप्टेंबर हा दिवस भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती म्हणून देशभर मोठ्या श्रद्धा व उत्साहाने साजरी करण्यात येते. भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे आद्य शिल्पकार तसेच श्रमिक, कारागीर व कौशल्याधारित कामगार जगताचे आराध्यदैवत म्हणून पूजनीय आहेत.

भारतीय समाजाच्या प्रगतीमध्ये श्रमिक, कारागीर, तंत्रज्ञ व विविध कौशल्याधारित कामगारांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोहार, सुतार, गवंडी, हस्तकला कारागीर तसेच विविध क्षेत्रांतील श्रमिक वर्ग दिनांक १७ सप्टेंबर रोजी आपल्या कामकाजातून वेळ काढून भगवान विश्वकर्मा जयंती श्रद्धापूर्वक साजरी करतात.

भारतीय मजदूर संघामार्फत देखील या दिवशी भगवान विश्वकर्मा पूजन, शोभायात्रा, श्रमिक वस्त्यांमध्ये सेवा उपक्रम, रक्तदान शिबिरे, विचारगोष्ठी तसेच श्रमिक हिताशी संबंधित विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक दिनांक ११ व १२ जुलै २०२६ रोजी पुणे येथे संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांमार्फत भारत सरकारकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी, श्रमिक जगताच्या भावना व योगदानाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने दिनांक १७ सप्टेंबर, भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस “राष्ट्रीय श्रमिक दिन” म्हणून घोषित करण्याबाबत भारत सरकारने सकारात्मक व उचित निर्णय घेण्या संदर्भातील निवेदन मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी जळगाव मा.सौ.वैशाली चव्हाण मॅडम यांच्या द्वारे देण्यात आले त्याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री सचिन लाडवंजारी,कामगार महासंघाचे झोन सचिव ज्ञानेश्वर पाटील,बांधकाम कामगार संघाचे भगवान वाघ,जिल्हा कार्यकारणी सदस्य महेंद्र कोळी,संजय शिरसाठ,जगदीश वंजारी,भूषण पाटील,संतोष चौधरी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button